शहरातून वाहणार्‍या ओढ्या-नाल्यांची स्वच्छता करुन सुशोभिकरण करणार - महापौर बाबासाहेब वाकळे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहरातून वाहणार्‍या ओढ्या-नाल्यांची स्वच्छता करुन ते कायमस्वरुपी स्वच्छ राहावेत यासाठी सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

महापालिकेच्या प्रभाग क्र.5 मधील सपकाळ चौक, भिंगारदिवे मळा येथील ओढ्याच्या कामाचा शुभारंभ भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महापौर वाकळे बोलत होते. कार्यक्रमास नगरसेविका आशाबाई कराळे, सोनाबाई शिंदे, नगरसेवक मनोज दुलम, भाजपाचे सावेडी मंडल अध्यक्ष सतिश शिंदे, तायगा शिंदे, उदय कराळे, सचिन देसर्डा, राजेंद्र भिंगारदिवे, संजय गाडेकर, हरिष भिंगारदिवे, अनिल भिंगारदिवे, माजी नगरसेविका आशाताई भिंगारदिवे, बाळासाहेब बारस्कर, श्रीकांत बारस्कर, जयंत कुलकर्णी, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, प्रशांत भालसिंग, किरण भिंगारदिवे, अभियंता मनोज पारखे, आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे पुढे म्हणाले, नगर शहराच्या विकासाचे एकेक प्रश्न हाती घेऊन ते पूर्ण करणार आहे. नागरिकांनी नगर शहर कायम स्वरुपी स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी मदत करावी. महापालिका प्रशासन आपले काम करतच आहे. परंतु त्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छता सर्वेक्षणात चांगली कामगिरी केली तर शहरासाठी मोठा निधी केंद्र सरकारकडून मिळू शकणार आहे.

नगरसेवक महेंद्र गंधे म्हणाले, केवळ प्रभागापुरतेच काम न करता आम्ही सर्व नगरसेवक व पदाधिकारी शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या नगर शहराचा सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post