निलेश आगरकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सहारा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार माय नगरचे संपादक निलेश आगरकर यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल भालसिंग यांनी दिली
सहारा प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजीक काम करणार्या पत्रकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व त्यांचा सम्मान करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार माय नगरचे संपादक निलेश आगरकर यांच्यासह पत्रकार अशोक तांबे, विजय गोबरे यांना नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सहारा प्रतिष्ठाचे अध्यक्ष, संस्थापक अंबरनाथ भालसिंग, नितीन तेलधने, सनी खंडागळे, राहुल पाखरे यांनी दिली. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुरस्कार मूर्तींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment