राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र अजिंक्य


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरातील वाडीया पार्कमध्ये २ ते ७ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय तृतीय क्रमांक बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. तर द्वितीय क्रमांक कर्नाटका तर,तृतीय क्रमांक डी.ए.व्ही (दिल्ली) तृतीय यांनी क्रमांक पटकाविला.

क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आजपासून ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी सुनंदा राजेंद्र पवार, अहमदनगर शहर विभागाचे संदीप मिटके,महापौर बाबासाहेब वाकळे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आर्थिक चांडक, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मंजुषा राणा, गांधी ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू,प्रियंका मिटके, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नावंदे आदी उपस्थित होते. वैयक्तिक खेळात मुलांमध्ये एन.पी उदित (केरळ),शौर्य सिग (दिल्ली),रोहन थुल (महाराष्ट्र), मुलीमध्ये लिखिता श्रीवास्तव (दिल्ली), रुद्रा राणी (महाराष्ट्र) व दुर्गा गुप्ता (दिल्ली) तर उत्कृष्ट खेळाडू म्हणुन मुलीमध्ये उदित एम.पी (केरळ) मुली मध्ये लिखिता श्रीवास्‍तव तसेच ऑल राऊंडर खेळाडू रोहन थुल (महाराष्ट्र) हा ठरला. राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सहा दिवस देशभरातील विविध राज्यातून खेळाडू नगरमध्ये मुक्कामी होते दरम्यान भोजन निवास व अन्य सुविधा व्यवस्थित ठेवल्याबद्दल खेळाडूंकडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याचे कौतुक करण्यात आले.
Previous Post Next Post