26 जानेवारीपासून मुंबई रात्रभर जागणार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- महाराष्ट्राची राजधानी मुंबई कधीच झोपत नाही असं म्हणतात. मध्यंतरी मुंबईच्या नाईट लाईफवर बंधने आली होती. पण आता मुंबई परत 24 तास जागणार आहे. कारण राज्याचे पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांनी मुंबईतील अरहिवासी भागात असलेल्या हॉटेल्स, मॉल्स आणि थिएटरना 24 तास खुले राहण्याची परवानगी दिली आहे. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होईल.

ही 24 सुरू रहाणारी नाईट लाईफ सध्यातरी रहिवासी भागातच प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नसल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. कारण, मुंबईच्या आधीच अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे रहावे असं वाटतंय का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे हॉटेल, मॉल्स, थिएटरमधील उद्योग आणि रोजगार वाढणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post