एमआयडीसी पुन्हा हादरली ; सुरक्षारक्षकाकडून सुपरवाझरचा खून


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- मनमाड रोडवरील एमआयडीसी येथील कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून झालेल्या मारहाणीत सुपरवाझर गंभीर जखमी होऊन मृत्यु झाला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली. या प्रकारामुळे एमआयडीसी पुन्हा हादरली आहे.

मनमाड रोडवरील एमआयडीसी येथे क्रॉम्प्टन ग्रीव्ह कंपनीत सुपरवायझर याबाबतची अधिक माहिती अशी की, राजाराम नामदेव वाघमारे (रा. भिंगार) हे मनमाड रोडवरील एमआयडीसी येथे क्रॉम्प्टन ग्रीव्ह कंपनीत सिक्युरिटीगार्डचे सुपरवायझर म्हणून नोकरीस होते. त्यांचे गुरुवारी सकाळी किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) या सुरक्षारक्षकासह काही कारणावरुन बाचाबाची झाली त्याचे स्वरुप हाणामारीत झाले. लोमटे याने केलेल्या मारहाणीत वाघमारे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यु नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुपनर हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post