'मातोश्री’वर खैरे-सत्तारांचा हातात 'हात'!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत सुरुंग लावल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. सोमवारी सत्तार व खैरे यांची उद्धव ठाकरेंसमक्ष मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर उभय नेत्यांमधील वाद मिटल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘शिवसेनेत पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करावे लागेल. अन्यथा तुमचा रस्ता मोकळा या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तार यांना कानपिचक्या दिल्या.

शिवसेनेत पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करावे लागेल, अन्यथा तुमचा रस्ता मोकळा अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना सोमवारी कानपिचक्या दिल्या. औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षादेशाला सुुरुंग लावल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि सत्तार यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. सोमवारी सत्तार आणि खैरे यांची ठाकरेंसमक्ष मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर उभय नेत्यांमधील वाद मिटल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post