महापालिका कर्मचारी पतसंस्था सभासदांचा आरोग्य विमा काढणार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे, वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च सर्व सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांचा आरोग्य विमा काढण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुदगल यांनी दिली आहे.
महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाबासाहेब मुदगल तर व्हाईस चेअरमनपदी विकास गिते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अक्षरा इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेसच्या वतीने विमा प्रतिनिधी राहूल भालेराव, स्टार हेल्थ कंपनीचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक सुहास करांडे, विठ्ठल उमाप आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी संचालक बाळासाहेब गंगेकर, किशोर कानडे, सतीश ताठे, जितेंद्र सारसर, शेखर देशपांडे, विलास सोनटक्के, बाळासाहेब पवार यांच्यासह सिद्धार्थनगर परिसरातील नवनाथ भालेराव, रवी भालेराव, विठ्ठल उमाप, संदिप शेकटकर, गुलाब गाडे, संदीप पठारे, प्रेम पठारे, दीपक मोहिते, रंगनाथ भालेराव, अरुण भालेराव, संतोष जगधने, बाबा कुटे, पवन जाधव, बंडू ससे, अंकुश सप्रे, अनिल मंडलीक, विलास पारधे, भानुदास शिंदे, अविनाश नेटके, बलराज गायकवाड आदी उपस्थित होते.
चेअरमन मुदगल पुढे म्हणाले, पतसंस्थेच्यावतीने नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. यापुर्वी आरोग्य विमा पॉलिसी काढण्यासाठी जे सभासद इच्छा व्यक्त करायचे त्यांची विमा हप्त्याची रक्कम संस्थेमार्फत भरली जायची व सभासदांकडून ही रक्कम सुलभ हप्त्यात वसुल केली जायची. आरोग्य विमा काढणार्या जागृक सभासदांची सं‘या कमी आहे. अनेक सभासदांनी अद्यापपर्यंत आरोग्य विमा काढलेला नाही. अशा सर्व सभासदांना विमा काढण्यासाठी आग‘ह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांनीही आरोग्य विमा महत्वाचा असल्यामुळे आपल्या सह आपल्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Post a Comment