अध्यक्षपदी शिवकन्या शिरसाट, सोनवणे उपाध्यक्ष
माय अहमदनगर वेब टीम
बीड - बीड जिल्हा परिषदेवर सुद्धा महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला आहे. येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवकन्या शिरसाट आणि उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. या दोन्ही उमेदवारांना शनिवारच्या मतदानानंतर विजयी घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करतानाच बीड जिल्ह्यातून भाजपने माघार घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे ट्विट चांगलेच चर्चेत आले. यामध्ये त्यांनी निकाल निश्चितच असल्याने आपण केवळ औपचारिकता म्हणून सहभाग घेत असल्याचे सांगितले.
Post a Comment