नगरसेवकाने प्रभागात स्व:खर्चातून दुरुस्त केले हायमॅक्स


मनपाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महानगरपालिकेची निवडणुक होऊन वर्ष झाले तरी आजूनही मनपाचा कारभार सुरुळीत सुरु झालेला नाही. गेल्या वर्षभरात लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे 7-8 महिने आचार संहितीत गेल्यामुळे अनेक साहित्य, कामांना मंजुरी, निधीची कमतरता, अधिकार्‍यांच्या बदल्या अशा एक ना अनेक कारणांनी मनपाच्या माध्यमातून नागरिकांची मुलभूत कामे रखडले. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे, पालिकेत अनेक विभागात साहित्याची कमतरता असल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. जे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत, लोकांकडून त्यांच्या अनेक अपेक्षा आहेत, परंतु मनपा कारभारामुळे पूर्ण होतांना दिसत नाही, त्यामुळे वैतागलेल्या नगरसेवकांनी आता स्व:खर्चातून छोटी-मोठी कामे करण्यास सुरुवात केली आहे.

माळीवाडा परिसरातील प्रभाग क्र.12 चे नगरसेवक दत्ता कावरे यांनीही वेळोवेळी पाठपुरवा करुन मनपाच्या इलेक्ट्रीक विभागत साहित्याची मागणी केली, परंतु साहित्य अभावी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले दिवे, स्ट्रीट लाईट दुरुस्त न झाल्याने त्यांनी स्व:खर्चाने साहित्य आणून हायमॅक्स दुरुस्त करुन घेतले. यामध्ये बंगालचौकी, बुरुडगल्ली, शिंदे गल्ली, गोंधळे गल्ली, फुलारी गल्ली, शेरकर गल्ली, मराठा मंगल कार्यालय, ब्राह्मण गल्ली, केवळ हॉस्पिटल, शनी मारुती मंदिर आदि ठिकाणी काही नवीन हायमॅक्स व काही दुरुस्त करुन प्रभागात उजेड पाडला आहे.

यावेळी प्रतिक्रिया देतांना दत्ता कावरे म्हणाले, गेल्यावर्षी नागरिकांनी मोठ्या अपेक्षांनी आम्हाला निवडून दिले. आम्ही नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मनपाकडे प्रभागातील विविध विकास कामांचे प्रस्ताव, निवेदने दिली परंतु यास प्रशासनाच्या कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. दरवेळी आचार संहिता, निधी नाही, मटेरियल शिल्लक नाही, अधिकारी नाही, मनुष्यबळ नाही अशी वेगवेळी कारणे सांगितली जात, त्यामुळे वैतागुन आम्ही हे स्व:खर्चातून कामे करुन नागरिकांना सुविधा देत आहोत. पुढील मनपाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आम्हाला आंदोलन करुन वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही श्री.कावरे यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post