थंडीचा कहर, 15 जणांचा बळी


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात भीषण थंडी पडली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, दिल्ली, चंडीगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील अनेक शहरात 5° पर्यंत तापमान घसरले आहे. झारखंडमध्ये थंडीने आतापर्यंत 15 जणांचा बळी घेतला आहे तर पंजाबमध्ये धुक्यामुळे अपघातात 12 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. रेल्वे आणि विमान प्रवासावरही थंडीचा परिणाम जाणवत आहे.

हवामान खात्याने सांगितल्यानुसार दिल्ली, हरियाणा, चंडीगड, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे. तर, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी धुके जसेच्या तसे आहे.

हवामान खात्याने मंगळवारी सकाळी दिल्लीचे तापमान 3° पेक्षा खाली गेल्याची नोंद केली आहे. तर दाट धुक्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त 25 मीटरपर्यंतचेच दिसत आहे. हवामान खात्याने पुढील 48 तासात धुक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post