केडगाव प्रेस असोसिएशनच्या अध्यक्षपदी समीर मनियार; उपाध्यक्षपदी प्रमोद पाठक यांची बिनविरोध निवड
सचिवपदी मुरलीधर तांबडे तर खजिनदारपदी अनिल हिवाळे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: केडगाव प्रेस असोसिएशनच्या अध्यक्षपदी वृत्तपत्रछायाचित्रकार समीर मनियार यांची तर सचिवपदी पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. केसरीचे प्रमोद पाठक यांची उपाध्यक्षपदी तर दिव्यमराठीचे उपसंपादक अनिल हिवाळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
केडगाव प्रेस असोसिएशनची वार्षिक बैठक जेष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात नव्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मनियार यांच्या अध्यक्षपदाची सूचना मावळते अध्यक्ष नितीन देशमुख यांनी मांडली. त्यास माजी सचिव योगेश गुंड यांनी अनुमोदन दिले. केडगाव परिसरात विविध क्षेत्रातील मान्यवरांची संवाद परिषद घेणे, आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे तसेच सांस्कृतीक व बालमहोत्सव, नवरात्रउत्सव, पत्रकार दिन आदि कार्यक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. केडगावच्या विकासात्मक जडणघडणीत पत्रकारांची भूमिका यावेळी निश्चित करण्यात आली .बैठकीस पत्रकार अरुण नवथर , रामदास बेंद्रे, संजय गाडिलकर , ओंकार देशपांडे, विक्रम लोखंडे , अन्वर मनियार , अमित मनियार , विजय मुळे , गणेश उनवणे ,दिगंबर खेत्रे,आदि उपस्थीत होते . नव्या पदाधिकाऱ्यांचे जेष्ठ पत्रकार व माजी अध्यक्ष रामदास नेहुलकर , महेंद्र कुलकर्णी , मिलींद बेंडाळे , जयंत कुलकर्णी , रविंद्र देशपांडे ,बबनराव मेहेत्रे यांनी अभिनंदन केले आहे .




Post a Comment