'या' अभिनेत्री साठी 'तो' पाच दिवस रस्त्यावर झोपला


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : सिनेस्टारसाठी त्यांच्या चाहत्यांचं क्रेझ तर सर्वांनाच माहीत आहे. यावेळी अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर निख्खळ प्रेम करणारा चाहता तिच्यासाठी काय करू शकतो याची अनुभूती घेतली. पूजाचा एक चाहता तिला भेटण्यासाठी मुंबईत आला. तेव्हा पूजा मुंबईत नव्हती.

पूजाला भेटल्याशिवाय जाणार नाही असा निश्चयच त्याने केला होता. यासाठी तो सलग पाच दिवस मुंबईच्या थंडीत रस्त्यावर झोपला. चाहत्याचं आपल्यासाठीचं हे प्रेम पाहून पूजा भावूक झाली. पण तिला भेटण्यासाठी चाहत्याला पाच दिवस रस्त्यावर झोपावं लागलं हे पाहून तिला फार वाईट वाटलं.

पूजा हेगडेने व्यक्त केलं दुःख, चाहत्यांना दिलं भरभरून प्रेम
पूजाला जेव्हा या चाहत्याबद्दल कळलं ती लगेच त्याला भेटायला गेली. चाहत्याचं नाव भास्कर राव असून त्याने तिच्यासाठी चॉकलेट आणले होते. भास्करला भेटतानाचा एक व्हिडिओ पूजाने शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, 'भास्कर राव मुंबईत येण्यासाठी आणि माझी पाच दिवस वाट पाहण्यासाठी धन्यवाद.'



'मला या गोष्टीने आनंदच झाला पण एका गोष्टीचं दुःखही आहे की, मला भेटण्यासाठी माझ्या चाहत्यांना एवढा त्रास सहन करावा लागला. माझ्यासाठी माझ्या चाहत्यांनी रस्त्यावर झोपावं असं मला कधीच वाटणार नाही. तुम्ही सर्व माझी ताकद आहात. माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post