जागरूक नागरिक मंचच्या उपक्रमांमुळे शहराच्या विकासास हातभार : आ.संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. जागरूक नागरिक मंच सारख्या संस्था राबवित असलेल्या उपक्रमांमुळे शहराच्या विकासास हातभार लागत आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जागरूक नागरिक मंचने दिल्ली गेट, चौक सक्कर चौक आणि आता मार्केट चौकात सीसीटीव्ही क्यामेरे लावून फार महत्त्वाचा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमांत नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या प्रयत्नातून वतीने व सामाजिक कार्यकर्त्या निर्मला भंडारी यांनी त्यांचे पती स्व. पोपटलाल भंडारी यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून मार्केटयार्ड चौकात अत्याधुनिक हायडेफिनेशनचे ३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेरांचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते मोबाईल द्वारे झाले. यावेळी महपौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलिस उपअधीक्षक मिटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, निलम भंडारी व नीरज भंडारी, माजी नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र गांधी, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रेखा जरे, छावा संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा सांगळे, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, संध्या मेढे, राम एजन्सीचे विष्णु मेघांनी, उदोजक संजय बोरा, मोहन लुल्ला व जागरूक नागरिक मंचाचे सर्व सदस्य उपस्थित होते. आवळा पॅलेसचे संचालक ज्ञानेश चव्हाण यांनी मार्केट यार्ड चौंकातील त्यांच्या हॉटेलमध्ये या कॅमेरांसाठी जागा दिली आहे.

पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके म्हणाले, जागरूक नागरिक व भंडारी कुटुंबीयांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही लावल्या मुळे गुन्ह्यांचा तपास होण्यास सहकार्य होणार आहे. कोल्हापूर येथील महानगरपालिकेने संपूर्ण शहरात असे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. याच धर्तीवर महापौरांनीही पुढाकार घेऊन शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत . शहरांमध्ये सध्या महानगरपालिका चांगली स्वच्छता करत आहे. त्यामुळे 25 कोटींचे बक्षीस निश्चित आहे. या बक्षिसाच्या रकमेतून मनपाने हा उपक्रम राबवावा.

महापौर वाकळे म्हणाले, सर्व प्रमुख भागांमध्ये जर सीसीटीव्ही लावले तर गुन्हेगार उघडकीस येतील व चोऱ्यांसारख्या घटनांवर चपराक बसेल. जागरूक नागरिक मंचने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. सुहास मुळे कायमच धडपड करत चांगले उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमांना महानगरपालिकेच्या वतीने व माझ्या वैयक्तिक सर्व सहकार्य राहील.

प्रास्ताविकात सुहास मुळे म्हणाले, जागरूक नागरिक मंचने २०२० सालात संपूर्ण नगर शहरातील प्रमुख चौक सीसीटीव्हीच्या निगराणीत आणण्याचा निश्चय केला आहे. या संकल्पस चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्मला भंडारी यांनी पतीच्या स्मरणार्थ मार्केट यार्ड चौकात कॅमेरा देण्याचा शब्द दिला होता. तो एकवीस हजार रुपये देऊन पूर्ण केला आहे. नागरिकांनीही भंडारी कुटुंबीयां पासून प्रेरणा घ्यावी. जागरूक नागरिक कोणत्याही राजकीय पुढारी, महानगरपालिका, शासनावर अवलंबून न राहता नागरिकांच्या सहभागातून शहरासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. आता महामार्गावरील रस्ता दुभाजकांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम हाती घेणार आहे. वास्तविक ही सर्व कामे शासनाची आहेत. मात्र अधिकारी फक्त लाखो रुपयांची पगार घेतात मात्र कामात मागे असतात. नगर पूना रोडवर केडगाव पर्यंत कायम ट्रॅफिक जाम असते. शनिवारी तर ट्राफिक जामने कहर केला. मात्र वाहतूक पोलिस वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी रस्ता सुरक्षा सप्ताहात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करत होती. म्हणजे जखम मांडीला अन औषध शेंडीला असे काम वाहतूक पोलिस करत आहेत. मात्र जागरूक नागरिक मंच शांत बसणार नसून वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही लावणार आहे.

यावेळी मार्केट यार्ड येथील व्यापारी संजय बोरा व माजी नगरसेवक संजय चोपडा यांनीही एका चौकात सीसीटीव्ही लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच निर्मला भंडारी यांनीही मार्च महिन्यात मुलांच्या वाढदिवसानिमित्त अकरा हजार रुपयाची देण्याचे जाहीर केले.

यावेळी जागरूक नागरिक म्हणजे सचिव कैलास दळवी, अभय गुंदेचा, बी.यु. कुलकर्णी, हरिभाऊ डोळसे, सुनील कुलकर्णी, धणेश बोगावत, अमेय मुळे, भैय्या खंडागळे, शिरसाट सर, गणेश गणगले आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post