केजरीवालांनी दिले हमीपत्र, दहा आश्वासने पूर्ण करणार,
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - दिल्लीत आणखी पाच वर्षांसाठी सत्ता मिळावी यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मतदारांना हमीपत्र दिले. त्यात दहा मुद्द्यांवर आश्वासन देण्यात आले असून त्याची पूर्तता केली जाईल, याची खात्रीही त्यांनी दिली. त्याशिवाय दिल्लीतील प्रदूषण तीनपटीने कमी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
केजरीवालांनी जाहीर केलेल्या गॅरंटी कार्डवर हरित दिल्ली करण्यासाठी आम्ही दाेन काेटींहून जास्त राेपटी लावणार आहाेत. या कार्डनुसार मुख्यमंत्र्यांनी चाेवीस तास अखंड वीजपुरवठा करण्याचे पहिले आश्वासन दिले आहे. शहर विजेच्या तारांच्या जाळ्यातून मुक्त हाेईल. प्रत्येक घरात भूमिगत तारांद्वारे वीज उपलब्ध करून दिली जाईल.
पक्षाने आगामी पाच वर्षांत चाेवीस तास शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत पाेहाेचवण्याचीदेखील हमी दिली आहे. त्याचबराेबर २० हजार लिटरपर्यंत पाणी माेफत उपलब्ध करून देण्याची याेजनाही त्यांनी जाहीर केली. दिल्लीतील मुलांना जागतिक पातळीवरील शिक्षण देण्याची तिसरी हमी दिली आहे. चाैथी हमी चांगल्या आराेग्य सुविधेची आहे. शहरात स्वस्त व व्यापक परिवहन सेवा देण्याचे पाचवी हमी दिली आहे. शहरात ११ हजारांहून जास्त बस व ५०० किलाेमीटरपर्यंत मेट्राे स्थानक सेवा उपलब्ध केली जाईल. साेबतच महिला, विद्यार्थ्यांसाठी बसची सेवा माेफत देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. सहावी हमी प्रदूषणमुक्तीची आहे. त्यात यमुना नदीच्या स्वच्छतेचाही विषय आहे. कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मी दिल्लीकरांना १० मुद्द्यावर हमी देत आहे. घाेषणापत्र नाही. सुधारित आहे. दिल्लीतील सामान्य नागरिकांच्या जीवनातील समस्यांशी संबंधित हे मुद्दे आहेत. त्याचा परिणाम दिल्लीतील सर्व लाेकांवर पडताे. त्यात शिक्षक, डाॅक्टर, विद्यार्थी, श्रमिक इत्यादी वर्गासाठी घाेषणा करण्यात आली आहे. पक्षाचे घाेषणापत्र जाहीर हाेण्यास किमान दहा दिवस तरी लागतील.
पुन्हा सत्तेवर आल्यास महिला सुरक्षेसाठी माेहल्ला मार्शल्सची नियुक्ती करणार
दिल्लीत पुन्हा सत्ता आल्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी माेहल्ला मार्शल्सची नियुक्ती करण्याचीही हमी केजरीवाल यांनी दिली आहे. अनधिकृत वसाहतींसाठी रस्ते, पाणी व्यवस्था, गटारे, सीसीटीव्ही व माेहल्ला क्लिनिकची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन या कार्डद्वारे देण्यात आले आहे. झाेपडपट्टीत राहणाऱ्या लाेकांना पक्की घरे देण्याचे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले.

Post a Comment