माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर –हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे मॉडेल आहे असे मत, हरियाणा राज्याचे सचिव डॉ.राजेश खोत यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत मांडले.त्यांनी बुधवार दि.२२ जानेवारी २०२० रोजी हरियाणा राज्यातील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी, व विकास सेवेतील एकूण २६ प्रमखांनी हिवरे बाजारला भेट दिली व विविध विकास कामाची पाहणी केली दरम्यान आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सविस्तर माहिती दिली.
या भेटीदरम्यान शिष्ट मंडळाने सांगितले कि, दूरदृष्टीचे नियोजन असेल व लोकसहभाग असेल तर शासनाची प्रत्येक योजना संपूर्ण आर्थिक,सामाजिक व गावाचे परिवर्तन घडू शकते.तापमानवाढीच्या बदलाचे होणारे परिणाम याबदल गावाने केलेले नियोजन अतिशय महत्वाचे आहे.शालेयस्तरापासूनच स्वच्छता ,पाणी व पिक नियोजन हे अतिशय कौतुकास्पद आहे.त्यामुळेच आज हिवरे बाजार देशाच्या नाहीतर आंतरराष्ट्रीय समुदायाला रोल मॉडेल ठरेल.
येथील अभ्यासातून देशातील ग्रामपंचायती सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल.गेली ३० वर्षे हिवरे बाजार गावाने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून एक समृद्ध गाव करताना अनेक चढ उतार या गावाने पाहिलेत.परंतु नेतुत्व व लोकसहभागाचा समन्वय असल्यास सरकारी योजना कल्याणकारी ठरतात म्हणूनच या गावात कामातील सातत्य अनुभवयास मिळाले.सामाजिक भावनेने काम केल्यास देशातील प्रत्येक पंचायत आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही.सर्व मान्यवरांना मा.श्री.पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment