गांधीनगरला रिक्षा पेटवली ; बोल्हेगावातील गुंडांचा बंदोबस्त करा - बोल्हेगावकरांची मागणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- बोल्हेगावच्या गांधीनगर भागात गुंडाकडून रस्त्याकडेला उभी असलेली रात्री रिक्षा पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, नगरसेवक कुमार वाकळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

गत आठवड्यात याच टग्यांनी रस्त्याच्याकडेला रस्त्याकडेला पार्क केलेला चारचाकी टेम्पोच्या काचा फोडल्या होत्या. काही घरावर दगडफेकही केली होती. त्या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा प्रवासी रिक्षा पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

गांधीनगरच्या नागरिकांनी नगरसेवक कुमार वाकळे यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारूण मुलानी यांना निवेदन देवून टग्यांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. पोलिसांनी नेहमीप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करण्याचे’ आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात कारवाईचा विसर पडला. गांधीनगर, बोल्हेगाव परिसरात पोलीस रात्रीची गस्त घालत नाहीत. त्यामुळे टग्यांचे मनोधौर्य वाढल्याने असे प्रकार घडत असल्याचे सांगत पोलीसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी पोलीस निरीक्षक मुलानी यांच्याकडे केली होती.

निवेदन दिले त्याच्या दुसर्‍याच दिवशी रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा प्रवासी रिक्षा जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. टग्यांचा वेळीस बंदोबस्त केला असता तर ही घटना घडली नसती. आतातरी पोलिसांनी टग्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post