फडणवीसांच्या भेटीनंतरही खडसे नाराजचच?


माय अहमदनगर वेब टीम
जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीनंतरही खडसेंची नाराजी कायम आहे. ही भेट जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात झाली असल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे. यावेळी नाराजी नाटय़ावर बोलणे खडसेंनी टाळले.

फडणवीस शुक्रवारी जळगावात होते. ते धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी खान्देश दौऱ्यावर असताना त्यांनी खडसे यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस, खडसे आणि महजान या तीन प्रमुख नेत्यांची जळगावात भेट झाली. यावेळी जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, या भेटीबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, भाजपत सारे काही आलबेल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. खडसे यांनी थेट फडणवीस आणि महाजन यांच्यामुळेच तिकीट न मिळाल्याचा आरोप केला होता. खडसेंच्या आरोपावर गिरीश महाजन यांनी खुलासा केला आहे. खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. त्यांनी जाहीरपणे त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला असला, तरी त्यांनी माझ्या कानात त्या व्यक्तीचे नाव सांगावे असे आवाहन महाजन यांनी खडसे यांना केले आहे. खडसे यांनी पुरावा दिला, तर पक्ष देईल ती शिक्षा घेण्यास मी तयार आहे. पण कोणताही पुरावा नसताना आरोप करणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे, असे महाजन म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post