'नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'झुंड'चे टीजर रिलीज
माय अहमदनगर वेब टीम - नागराज मंजुळेच्या दिग्दर्शानत बनत असलेली अमिताभ बच्चन स्टारर 'झुंड'चे टीजर आज रिलीज झाले. 1 मिनीट 12 सेकंदाच्या या टीजरमध्ये सुरुवातीचे 12 सेकंद ब्लॅक बॅकग्राउंडमध्ये प्रोड्यूसर्सचे नाव दाखवले जात आहेत. तर 13 व्या सेकंदाला अमिताभ यांचा आवाज ऐकू येतो, त्यात ते म्हणातात, 'झुंड नहीं कहिए सर, टीम कहिए टीम...'। त्यानंतर व्हिडिओत काही मुले हातात चेन, लाठ्या, विट, दगड आणि बॅट घेऊन जात असलेले दिसत आहेत. चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट येत्या 8 मे 2020 ला रिलीज होत आहे.
चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन असणार आहेत. नागपूर येथील प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. झोपडपट्टीमधील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. नागपूर येथेच या चित्रपटाचे शूटिंग झाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार याबाबतही उत्सुकता लागलेली आहे.
Post a Comment