दाेनपेक्षा अधिक मुले जन्माला घालणाऱ्या नागरिकांचा मताधिकार काढा - बाबा रामदेव
माय अहमदनगर वेब टीम
पाटणा - लोकसंख्या नियंत्रणासाठी कठाेर कायदा करण्याची गरज आहे. दाेनपेक्षा अधिक मुले जन्माला घालणाऱ्या नागरिकांचा मताधिकार काढला पाहिजे, असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी सोमवारी व्यक्त केले. चौथे मूल जन्माला घातले तर त्या मुलाचाही मताधिकार काढला पाहिजे, असे ते म्हणाले. लोकांना मुले जन्माला घालण्याचे स्वातंत्र्य आहे. पण मर्यादेपेक्षा जास्त नको. मर्यादेबाहेर गेलेली लोकसंख्या ओझे बनून राहील. जगातील इतर देशांनी लाेकसंख्या नियंत्रणासाठी पावले उचलली आहेत. आपल्या देशातही याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मुले दोनच चांगली, असे ते म्हणाले.
Post a Comment