माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मी कोणाचाही खून न करता लोकशाहीच्या मार्गाने चाललो आहे. मी फक्त लोकशाही मार्गाने बोलतो.ज्यांनी आयुष्यात रक्तपात केला, त्यांना लोकशाही समजणार नाही. हक्क व अधिकार समजणार नाही. यामुळे त्यांची दखल घेण्याची मला गरज नाही, असे मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या आरोपावर व्यक्त केले. दरम्यान सीएए' च्या निमित्ताने फक्त आपलाच छळ होतोय, असे मुस्लिमांनी समजण्याचे कारण नाही. जुन्या काळात मुस्लिमांपेक्षाही जास्त छळ हिंदुंमधील क्षुद्र मानल्या गेलेल्या जातींचा झाला आहे. मुस्लिमांमध्ये हक्काचे कब्रस्थान तरी होते. मात्र , आमच्या बापजाद्यांचा अंत्यविधी कोठे झाला हे आम्हाला माहिती नाही ,
असे ही ते म्हणाले.
नगर येथे सभेसाठी आले होते. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांची संवाद साधला त्यावेळी ते बोलते होते. यावेळी आ. संग्राम जगताप, काँग्रेसचे उबेद शेख, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदी उपस्थित होते. हिंदूराष्ट्र सेनेने सीएए संदर्भात होत असलेल्या सभांवर आरोप करत सभा उधळून लावण्याचा इशारा धनंजय देसाई यांनी दिला होता. त्या आरोपाला उत्तर देताना मंत्री आव्हाड म्हणाले, त्यांना तेवढेच काम आहे, हत्या करणे बॉम्बस्फोट घडवणे, नंग्या तलवारी नाचवणे अशा गोष्टी जमतात. आम्ही गांधींचे वारसदार असून त्यांच्या मार्गाने चालत आहोत.

त्यांच्यासारख्या गोष्टी आम्हाला जमत नाहीत, कारण आम्हाला संविधान वाचवायचे आहे. त्यांना संविधान उडवायचे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सीएए संदर्भात आमच्या पक्षाने या अगोदरच भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय काय घ्यायचा तो मुख्यमंत्री जाहीर करतील असेही ते म्हणाले. सीएए हा कायदा बहुजनांच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जेव्हा सर्वसामान्य जनता स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत होती , तेव्हा आरएसएसवाले कोठे होते ? या अनुषंगाने आपण ते इंग्रजांचे तळवे चाटत असल्याचे विधान केले होते. नागरिकत्व कायद्यातील दुरूस्ती केवळ मुस्लिम विरोधी नाही. खरे तर ती बहुजनांच्या विरोधात आहे . पूर्वीच्या काळी आणि अजूनही काही भागात हिंदूंमधील काही जाती वंचित आहेत. त्यांना मंदिर प्रवेश नाही , स्माशनभूमी नाही , पाणवठा नाही , एवढे काय गावातही प्रवेश नसलेल्या जाती असल्याचे त्यांनीी सांगितले.
' मुस्लिमांना तरी पाचशे वर्षांहून अधिक जुनी असलेली हक्काची क्रबस्थाने आहेत. आमच्या बापजाद्यांना तीही नव्हती. ज्यांनी ही अस्पृशता सुरू केली, तेच आज ' सीएए ' च्या नावाखाली आमच्या बापाचा जन्म कोठे झाला हे विचारणार का ? जगात कोणत्याही देशात, कोणत्याही जमाती छळ झाला नसेल एवढा छळ ओबीसी वर्गात मोडणाऱ्या अनेक जातीचा झाला आहे. एवढे वाईट जीवन जगात कोणाच्याही वाट्याला आले नसेल, ' असेही ते म्हणाले .

महात्मा गांधी यांनी १९४२ रोजी ब्रिटिशांविरोधात आंदोलन छेडले होते. संपूर्ण देश या आंदोलनात सहभागी झाला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मात्र, या आंदोलनाला विरोध केला होता. देशाला स्वातंत्र्य मिळूच नये, असे त्यांना वाटत होते. याला ब्रिटिशांचे तळवे चाटणे म्हणायचे नाही तर काय? हा इतिहास आहे आणि तो मी फक्त सांगत आहे, असा आरोप ही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Post a Comment