अहमदनगर - सलग चार दिवस नगर मध्ये सुरु असलेल्या अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांना नगर मधील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.राज्यातून आलेल्या स्पर्धकांनी नगरच्या प्रेमळ स्वागत व व्यवस्थेचा मनमुराद आनंद घेतला.या स्पर्धेचा शानदार पारितोषिक वितरण सोहळा सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मुक्ता बर्वे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, सत्यजित तांबे,पोअप्प्प्र पोलीस आधीक्षक संदीप मिटके, झी युवा व झी मराठीचे निलेश मयेकर,मोहिनीराज गटणे,नरेंद्र फिरोदिया,आशाताई फिरोदिया,रिंकू फिरोदिया,परीक्षक अश्विन पाटील ,विनोद लव्हेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न झाले.
यावेळी सिनेकलाकार मुक्ता बर्वे म्हणाल्या की,कला सादर करणे महत्वाचे असून या स्पर्धेत सर्वच कलाकारांनी प्राण व जीव ओतून काम केले आहे.येथे सादर झालेल्या एकांकिकाचे विषय पाहून पुन्हा नाटकात काम करण्याची इच्छा निर्माण झाली.या स्पर्धे निमित्त नगर मध्ये राहण्याचा योग आला. नगर सारखे प्रेक्षक व रसिक आज पर्यंत कुठल्याच स्पर्धेत पहावयास मिळाले नाही येथील आदर व प्रेम पाहून मलाही आय लव्ह नगर म्हणण्याची सवय झाली.स्पर्धेसाठी सहपरिवार उपस्थित राहणाऱ्या फिरोदिया परिवाराने वेगळा आदर्श निमाण केला असून संपूर्ण परिवारच नगरच्या कलाकारांच्या पाठीशी उभे असल्याने नगरच्या कलाकारांना उज्वल भविष्य असेल यात शंकाच नाही.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगरवरील प्रेमापोटी फिरोदिया परिवाराने अहमदनगर महाकरंडक नावाने स्पर्धा आयोजित करून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. नगरची नावाजलेले कलाकार निर्मितीची चळवळ व परंपरा जोपासली जाईल. तसेच कलाकारांनी कलाकार घडविण्याचा हा सोहळा सर्वांना उत्साह व प्रेरणा सतत देईल असा विश्वास व्यक्त केला.
सत्यजित तांबे, जिल्हाधिकारी राहुल दिवेदी व परीक्षकानी मनोगत व्यक्त केले. मा. नरेंद्र फिरोदिया यांनी स्वागत केले, ते म्हणाले की,नगरच्या नव्हे तर राज्यातील कलाकारांना प्रोत्साहन देणे या हेतूने २०१३ मध्ये सुरु झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांनी आज नावलौकिक प्राप्त केला आहे. यंदाच्या स्पर्धेत अवयव दान ,तंत्रज्ञान,सामाजिक विषमत,नव्या पिढीच्या समस्या अशा नवनवीन विषयावर एकांकिका सादर झाल्या. स्पर्धेचा वाढता प्रतिसाद पाहता महावीर प्रतिष्ठान व आय लव्ह नगरच्या सहकार्याने पुढील वर्षी आठ दिवस स्पर्धेचे नियोजन करावे लागेल.तसेच पुढी वर्षी स्पर्धेसाठी येणाऱ्या संघांना एैतिहासिक नगरचे दर्शन घडविण्यात येईल.
प्रास्ताविकात स्वप्नील मुनोत यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धकांना सर्वोत्तम सेवासुविधा देणे व त्यांना कलासादरी करण्यासाठी आम्ही सहकार्य करणे हि जबाबदारी समजतो.तुमच्या अडचणी आम्ही जाणतो त्याच प्रमाणे आमच्या अडचणी समजून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल बोरा,अभिजित दळवी,राकेश भंडारी,चेतन भंडारी,रोहित भंडारी,निखील गांधी,आनंद मुनोत,नितीश कटारिया,आनंद बोरा,अवधूत गुरव,गगन शिंदे,सौरभ कुलकर्णी ,विवेक जोशी,कमलेश ,प्रशांत जठार अशोक अकोलकर,अक्षय मुनोत,सागर मेहत्रे,सुमित वाघ, निखील गांधी,शेखर वाघ,अक्षय दारकुंडे,शुभम पारधे व महावीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसाद बेडेकर व पुष्कर तांबोळी यांनी केले. पारीतोषीक वितरण दरम्यान विविध कलाकारांनी नृत्य,गीत, विनोदी नाट्यकला सादर केली. आभार अमोल खोले यांनी मानले. एकांकिका स्पर्धक व नगर मधील कलाकारांच्या उपस्थितीने माऊली सभागृह भरून गेले होते.
स्पर्धेचा निकाल –
वैयक्तिक पारितोषिके लेखन:
प्रथम: राजरत्न भोजने (ए बास्टर्ड पॅट्रिअट)
द्वितीय : ईश्वर अंधारे (निरुपण)
तृतीय: पराग फडके,कादंबरी मानी (मोठा पाऊस आला आणि...)
चतुर्थ : रोहित कोतेकर,अभिषेक गावकर(ब्रम्हास्त्र)
उत्तेजनार्थ : योगेश सप्रे, रश्मी घन (कोणीतरी पहिलं हवं)
वैयक्तिक पारितोषिके रंगभूषा:
प्रथम: गायत्री चक्रदेव (द कट)
द्वितीय : जॉय भांबळ (काळोखाचा रंग कोणता ...?)
वैयक्तिक पारितोषिके वेशभूषा:
प्रथम: गायत्री चक्रदेव (द कट)
द्वितीय : शुभांगी सूर्यवंशी (ब्रम्हास्त्र)
वैयक्तिक पारितोषिके प्रकाश योजना
प्रथम: शाम चव्हाण (भाग धन्नो भाग)
द्वितीय निखील मारणे (निरुपण )
तृतीय: शर्वरी लहाडे , राहुल मूडलगे ( द कट)
वैयक्तिक पारितोषिके संगीत
प्रथम: हर्श विजय (निरुपण )
द्वितीय : गायत्री चक्रदेव, वैभव रंधवे (द कट)
तृतीय: योगेश सप्रे, क्षितीज भट,तन्मय भागवत (कोणीतरी पहिलं हवं)
वैयक्तिक पारितोषिके नेपथ्य
प्रथम: उज्ज्वल काणसकर (ब्रम्हास्त्र)
द्वितीय : केतन दूदवडकर (भाग धन्नो भाग)
तृतीय: सिद्धेश नांदलस्कर (ठसका)
वैयक्तिक पारितोषिके विनोदी कलाकार
प्रथम: धीरज कांबळे (ठसका)
द्वितीय : हार्दिक सुतार (भाग धन्नो भाग)
वैयक्तिक पारितोषिके अभिनेता
प्रथम: रोहन सुर्वे (ब्रम्हास्त्र)
द्वितीय: प्रमोद पुजारी (इट हॅपन्स)
तृतीय: सागर शिंदे (भाग धन्नो भाग)
उत्तेजनार्थ : प्रल्हाद काळे (मुक्ताई) व स्तिमीत साने (कोणीतरी पहिलं हवं)
वैयक्तिक पारितोषिके अभिनेत्री
प्रथम: भाग्य नायर (सुंदरी) व आरती बिराजदार (निरुपण)
द्वितीय : श्वेता पारखे (फुलवरा)
तृतीय: कोमल वजारे (ब्रम्हास्त्र)
उत्तेजनार्थ : निकिता घाग (भोकरवाडीचा शड्डू)
वैयक्तिक पारितोषिके सहाय्यक अभिनेता :
प्रथम: प्रसन्न मानगावकर (मोठा पाऊस आला आणि...)
द्वितीय : प्रद्युम्न गायकवाड (फुलवरा)
वैयक्तिक पारितोषिके सहाय्यक अभिनेत्री :
प्रथम: सीमा निकम (द कट)
द्वितीय : नुपूर राणे (ठसका)
वैयक्तिक पारितोषिके दिग्दर्शन
प्रथम: रोहित मोहिते, रोहित कोतेकर(ब्रम्हास्त्र)
द्वितीय : शर्वरी लहाडे (द कट)
तृतीय: रोहित,निलेश,प्रशांत (ठसका)
उत्तेजनार्थ : अनिरुद्ध दांडेकर (मोठा पाऊस आला आणि...) व विशाल माने, राकेश जाधव (सुंदरी)
सांघिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट एकांकिका, प्रथम : निरुपण (रंगपंढरी, पुणे ), ब्रम्हास्त्र (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई)
सर्वोत्कृष्ट एकांकिका, द्वितीय : ए बास्टर्ड पॅट्रिअट (दिशा थिएटर्स आणि ओंकार प्रोड., मुंबई )
सर्वोत्कृष्ट एकांकिका, तृतीय : मोठा पाऊस आला आणि... (रंगयात्रा, इचलकरंजी), इट हॅपन्स (गायन समाज देवल क्लब,कोल्हापूर)
सर्वोत्कृष्ट एकांकिका, चतुर्थ : भोकरवाडीचा शड्डू (सतीश प्रधान ज्ञान.महाविद्यालय, मुंबई), सुंदरी (जिराफ थिएटर्स, मुंबई.)
सर्वोत्कृष्ट एकांकिका, उत्तेजनार्थ : भाग धन्नो भाग (मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई)
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी एकांकिका : द कट (वलय नाट्य संस्था,पुणे)
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका बक्षिस: ठसका (रंगसंगती कलामंच, मुंबई)

Post a Comment