ऑस्ट्रेलियात आगीचा तांडव ; 25 जणांचा बळी, पावसाची कृपादृष्टीने वाचले अनेकांचे प्राण


माय अहमदनगर वेब टीम
मेलबर्न : ऑस्ट्रेलियात धगधगलेल्या आगीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या भयंकर आगीच्या झळा जगभरातल्या प्रत्येक नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत. या आगीमध्ये अनेक माणसांनी त्याचप्रमाणे प्राणी आणि पक्ष्यांनी आपले प्राण गमावले आहेत. ही आग आटोक्यात येण्यासाठी प्रत्येकाने देवाकडे प्रार्थना केली. अखेर देवाने ती प्रार्थना ऐकली आहे. अखेर ऑस्ट्रेलियात वरुण राजा बरसला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

पावसाचं आगमन झाल्यानंतर प्रचंड खूश झालेल्या ऑस्ट्रेलियन बांधवांनी सोशल मीडियावर काही व्हीडिओ पोस्ट केले आहेत. या व्हीडिओमध्ये त्यांना झालेला आनंद सर्व काही सांगून जात नाही. भडकलेल्या आगीने आतापर्यंत तब्बल २३ जणांचा बळी घेतला आहे. तर ५० कोटी प्राणी आणि पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले.

या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी ३ हजार रिझव्‍‌र्ह सैनिकांना बोलावून घेतले होते, तर आता पावसामुळे आग आटोक्यात येत आहे. या पावसांच्या सरींमध्ये नाचून कांगारूंनी पावसाचे स्वागत केले आहे.

सध्या सोशल मीडियावर तेथील पावसाचे व्हीडिओ आणि फोटो शेअर आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्टच्या संशोधनानुसार या आगीत ४८ कोटी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या आगीचे पडसाद संपूर्ण जगात पसरले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार २०१७च्या आधीपासून ऑस्ट्रेलिया दुष्काळाचा सामना करत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post