माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- 4 जानेवारी रोजी बँकेने 33 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेले आहे. सन 2018-19 साली सर्वोत्कृष्ट महिला बँक प्रथम पुरस्कार, व्यवसायातील वाढ बँकेचा नावलौकिक वाढवून आपला सर्वांचा आनंद द्विगुणीत करणारे होऊन गेले. यामध्ये आपणा सर्वांचे योगदान, श्रम आणि आपुलकी सामावलेली आहे. याचा मनस्वी आनंद आम्हा सर्वांना होत आहे. गेल्या 32 वर्षात जिल्ह्यातील महिलांना बचतीची सवय लावुन सर्वांगीण विकासासाठी बँकेने मोलाचे कामकाज केले असल्याचे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा डॉ. सौ. लता फिरोदिया यांनी केले.
बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या ठेवीवरील व्याजदर अर्धा टक्क्यांने वाढविलेला आहे आणि सोनेतारण कर्जाची रिबेट सवलत 2 टक्के मंजुर करण्यात आली आहे. तसेच कोअर बँकींग, ग्राहकांस प्रत्यक्ष समन्वय, ग्राहकांची माहिती संकलन, उत्पादित वस्तु सेवांच्या देवाण घेवाणी संबंधी प्रदर्शन, व्यवसाय निगडित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती बँकेच्या संस्थापिका प्रा. मेधाताई काळे यांनी दिली.
डिसेंबर 2019 अखेर बँकेचा एकुण व्यवसाय 132 कोटीचा असून बँक ही नवीन वर्षात डिजिटलायझेशनच्या दृष्टीने परिपुर्ण असून बँकींग सेवेत कुठेही कमी पडत नाही असे बँकेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. सौ. संध्या जाधव यांनी केले.
सन 2020 हे नुतन वर्ष बँकेचा उज्वल काळ असणार आहे. या वर्षामध्ये बँकेच्या सर्व ग्राहकांची ईच्छा स्वप्नपुर्ती होवो तसेच हे वर्ष बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतकांना व नागरिकांना सुख-समृध्दीचे, आनंददायी, आरोग्यदायी, भरभराटीचे जावो ही व्यवस्थापन, संचालिका मंडळाच्यावतीने वर्धापनदिनी हार्दिक शुभेच्छा.
Post a Comment