13 वर्षांपासून टीम इंडियाची विजयी माेहीम कायम


माय अहमदनगर वेब टीम
चेन्नई - भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिकेला रविवारी सुरुवात होत आहे. टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारत वनडेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. रेकॉर्ड देखील भारताच्या बाजूने आहे. गेल्या १३ वर्षांत विंडीज टीम आपल्या विरुद्ध वनडे मालिकेत विजय मिळवू शकली नाही. सर्व ९ मालिका टीम इंडियाने जिंकल्या. विंडीजने अखेरच्या वेळी २००६ मध्ये आपल्याला ४-१ ने हरवले होते. दोघांत ही २१ वी द्विपक्षीय मालिका आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या २० मालिकेपैकी भारताने १२ आणि विंडीजने ८ जिंकल्या. दोघांत अखेरच्या पाच वनडे सामन्यात भारताने बाजी मारली.

चेपक मैदानावर टीम इंडियाने १२ सामने खेळले. ७ जिंकले, ४ गमावले आणि एक रद्द झाला. २०१९ मध्ये भारताने सर्वाधिक १७ सामने जिंकले : २०१९ मध्ये भारताने वनडे मालिकेत सर्वाधिक १७ सामने जिंकले. यादरम्यान २५ सामने खेळवण्यात आले. सात लढती गमावल्या. विंडीजने देखील एकूण २५ समाने खेळले. त्यांनी ९ जिंकले व १३ गमाावले. ३ सामन्याचा निकाल लागला नाही. ऑस्ट्रेलिया १६ सामने जिंकत दुसऱ्या स्थानी आहे.

खेळपट्टी : गत ५ मॅच, सरासरी २४८ धावा. ४ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला.
हवामान अहवाल : सकाळी पाऊस होऊ शकतो. दुपारी १ वाजता व रात्री ९ वाजता पावसाची शक्यता आहे.

कोहली विश्वविक्रमापासून एक शतकाने अाहे दूर

कोहलीने विंडीजविरुद्ध ३५ डावात ७७ च्या सरासरीने २१४६ धावा काढल्या. ९ शतके आणि १० अर्धशतके झळकावली. तो विडींज विरुद्ध सर्वाधिक धावा कारणारा फलंदाज बनला. त्याने मालिकेत एक शतक ठोकल्यास, एका देशाविरुद्ध १० शतके करणारा ताे जगात पहिला फलंदाज बनेल. सध्या हा विक्रम संयुक्तरीत्या कोहली व सचिनच्या नावे आहे.

रवींद्र जडेजाला अव्वल स्थानासाठी ६ बळींची गरज

रवींद्र जडेजाचे विंडीज विरुद्ध ३८ बळी आहेत. त्याने या मालिकेत ६ बळी घेतल्यास तो विंडीज विरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा पहिला भारतीय बनेल. कपिल देव ४३ बळींसह पहिल्या व अनिल कुंबळे ४१ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे. जडेजाने विंडीज विरुद्ध २०५ धावा देखील केल्या. सध्याचा संघात मो. शमीने ३२ आणि डावखुरा कुलदीपने २१ बळी घेतले.

संभाव्य संघ : भारत - रोहित,लोकेश राहुल, कोहली, श्रेयस, ऋषभ पंत, दुबे,जडेजा, मो. शमी, दीपक चाहर, यजुवेंद्र, कुलदीप. विंडीज : होप, लेविस, हेटमायर, रोस्टन चेस, पुरन, पोलार्ड, होल्डर, कोट्रेल, रोमारियो शेफर्ड, हेडन वॉल्श, अल्जारी जोसेफे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post