या क्रिकेटर केला लाजिरवाणा विक्रम, पूर्ण केले शुन्यावर आउट होण्याचे शतक


माय अहमदनगर वेब टीम
स्पोर्ट डेस्क - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पण, हा विक्रम त्याच्यासाठी अत्यंत लाजिरवाणा आहे. कारण आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमध्ये 100 वेळेस शुन्यावर आउट होण्याचा विक्रम बनवला आहे. सध्या बांग्लादेश प्रीमियर लीग (बीपीएल)मध्ये खेळत असलेल्या आफ्रिदीने शुक्रवारी राजशाही रॉयल्सविरुद्ध शुन्यावर आउट झाला आणि त्याच्या नावे या विक्रमाची नोंद झाली.
आंतरराष्ट्रीय सामन्यात 44 वेळेस शुन्यावर आउट

पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ मध्ये अफ्रीदीच्या या नव्या रेकॉर्डवर रिपोर्ट
प्रकाशित झाली. या रिपोर्टनुसार, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अफ्रीदी एकूण 44 वेळेस शुन्यावर आउट झाला आहे. लाला नावाने ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिदी वनडे क्रिकेटमध्ये 30, टेस्ट क्रिकेटमध्ये 6 आणि टी-20 मध्ये 8 वेळा एकही रन न काढता माघारी परतला. इतर 56 वेळा तो फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि टी20 लीग सामन्यात आउट झाला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा शुन्यावर आउट होण्यामध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचे नाव आहे. तो 34 वेळा शुन्यावर आउट झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post