नवीन वर्ष 12 राज्यांत घेऊन येणार 2 दिवस कडाक्याची थंडी




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - गेल्या दाेन दिवसांपासून शिखरांवर हाेत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम देशातील मैदानी राज्यांत दिसू लागला आहे. थंडीच्या लाटेमुळे कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. आगामी ४८ तासांत या वातावरणापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला गारांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार संपूर्ण हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, बिहारसह पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आेडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या काही भागात दाेन दिवसांत हुडहुडी भरणारी थंडी पडेल. ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत संपूर्ण पूर्व व मध्य भारतात पावसासाेबत गारा पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात २ जानेवारीपर्यंत थंडी ठाण मांडून राहील. त्याशिवाय आगामी तीन दिवस या भागात दाट धुकेही पसरू शकते. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, सिक्कीम व आेडिशातही दाेन दिवस धुक्याचे साम्राज्य दिसेल. ३० डिसेंबरनंतर ४-५ दिवसांपर्यंत ईशान्येकडील भागात धुके दिसून येईल.

किनारी भागात पाऊस : हवामान विभागानुसार उत्तर अफगाणिस्तानच्या वरील भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. हवामानातील ही प्रणाली ३० डिसेंबरपासून पश्चिम हिमालयावर प्रभाव टाकू शकते. पूर्व आसाममध्ये वादळी वाऱ्याचे क्षेत्र तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व आेडिशाच्या किनारपट्टीवर पाऊस हाेऊ शकताे. ईशान्येकडील काही राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेऊ शकताे.

४८ तासांत ३८ लाेकांचा मृत्यू
प्रचंड थंडीच्या लाटेमुळे उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशात ४८ तासांत ३८ लाेकांचा मृत्यू झाला. बिहारमधील पाटणा, गया, भागलपूर, पूर्णिया जिल्ह्यात पारा घसरला आहे. त्यामुळे थंडीने अनेकांचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post