माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागचे भूसंपादन करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत तातडीने बैठक आयोजित करून निर्णय करण्याचे निर्देश रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याची माहीती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण पूल आणि नगर शिर्डी या महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून जिल्ह्यातील या दोन्ही महत्वपूर्ण रस्त्यांकडे लक्ष वेधले.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख आशिष शर्मा यांच्या प्रमुख झालेल्या बैठकीत खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण पुलाचा मार्ग हा संरक्षण विभागाच्या जागेतून जात असल्याने या जागेचे भूसंपादन होण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असल्याने याबाबत तातडीने निर्णय होण्याची गरज व्यक्त केली. यासंदर्भात पुढील आठवड्यातच केद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आहे त्या परीस्थितीत प्रथम प्राधान्य क्रमाने पूर्ण करण्याची खा.डाॅ.विखे यांनी केलेली मागणी मंत्री गडकरी यांनी मान्य करून विभागाच्या अधिकार्याना सूचना दिल्या असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे म्हणाले.
Post a Comment