गाझीनगरचा पाणीप्रश्न आठ दिवसात मार्गी लावणार



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - अनेक महिन्यांपासून नळाला पूर्ण दाबाने पाणी येत नसल्याने व मनपा प्रशासनाला वारंवार मागणी करुन देखील पाणी प्रश्‍न सुटत नसल्याने काटवन खंडोबा रोड येथील गाझी नगर भागातील महिलांसह नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. आमदार जगताप यांनी सदर प्रश्नाची दखल घेत या भागाची समक्ष पाहणी करून महिलांशी संवाद साधला. तर येत्या आठ दिवसात सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच महापालिका पाणीपुरवठा विभागाचे परिमल निकम, इंजिनीयर काकडे, गाडळकर यांच्याशी चर्चा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे सूचना केल्या.

काटवन खंडोबा रोड येथील गाझी नगर भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून नळ कनेक्शन असून देखील त्याला पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना भटकंती करावी लागत असून, शहरात राहून देखील ग्रामीण भागात राहत असल्याची परिस्थिती मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे. पाण्याची पाईपलाईन टाकल्या पासून शेवटच्या टप्प्यात आतील भागात राहत असलेल्या नळांना अद्यापि कधी पाणी आलेले नाही. संपूर्ण उन्हाळ्यात या भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र हा प्रश्‍न अधिकच गंभीर बनत चालला असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यावेळी हाजराबी शेख, हसीना शेख, समिना शेख, कमल दातरंगे, फरिदा शेख, आशा गायकवाड, कमल इंगळे, सकिना शेख, रेहाना बागवान, मनिषा शिंदे, आशा शिंदे, शाहिन शेख, नजीर पठाण, भास्कर गायकवाड, खलील शेख, प्रकाश शिंदे आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post