मुंबई - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरती केली जात आहे. यामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) पदासाठी 828 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
आजचा सकाळी पोलीस शिपाई चालक पदासाठी १०२९ जागांची भरती करण्यात येणार असल्याची जाहिरात प्रकाशित झाली होती. त्यानंतर लगेचच ही जाहिरात झळकल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या विभागात पार पडेल भरती
राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे – ७४ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे – २९ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर – ११७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड – ५७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड – ४३ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई – २७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद – १७ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया – ३८ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला – १७६ जागा
राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – २५० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR
अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM
Post a Comment