.....म्हणाल्या - 'राज्याच्या राजकारणाला नवे वळण पवारांनी दिले'
माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - 'शरद पवार अामचे खूप जुने सहकारी आहेत. प्रशासनावर पकड असलेले पवार हे केवळ राजकारणी नव्हे, तर मुत्सद्दी नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला नुकतेच नवे वळण देण्याचा प्रयत्न करुन त्यांनी देशाचे लक्ष वेधून घेतले', असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बुधवारी काढले. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत राजकीय जीवनात केलेल्या कार्याचा पटही उलगडला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्रातर्फे बुधवारी नागपुरात प्रतिभाताईंचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, कृपाल तुमाने, आमदार विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.
Post a Comment