जिल्हा परिषद : काँग्रेसच्या गटनेतेपदी अजय फटांगरे



प्रदेश काँग्रेस कमिटीची शिफारस : जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर:
जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटनेते पदी जि.प.सदस्य अजय फटांगरे यांची निवड करण्यात आली. फटांगरे यांच्या शिफारशीचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे पत्र प्रस्तावासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना शुक्रवारी रोजी सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात या वेळी काँग्रेसच्या गटातील सदस्य उपस्थित होते. या प्रक्रियेनंतर अजय फटांगरे यांच्या गटनेते पदावर रात्री उशिरा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मान्यतेची मोहोर उमटवली.

मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची नव्याने निवड होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पदाधिकारी निवडीसाठी चार दिवस बाकी असताना दि.२१ रोजी आशाताई दिघे यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या गटनेते पदासाठी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या नावाची शिफारस प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा निरीक्षक आ. मोहन जोशी यांच्या सही शिक्­क्­याचे हे पत्र घेऊन काल जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या गटातील सदस्य शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी द्विवेदींच्या भेटीला दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपजिल्हाधिकारी पाटील यांच्यासह काँग्रेसच्या गटातील सदस्य व काँग्रेसचे नेते बाळासाहेब हराळ, ज्ञानदेव वाफारे आदी उपस्थितीत होते. दरम्यान या प्रक्रियेनंतर अजय फटांगरे यांच्या गटनेते पदावर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मान्यतेची मोहोर रात्री उशिरा उमटविली.


काँग्रेस गटातील सदस्य
अजय फटांगरे,भाऊसाहेब कुटे, रामहरी कातोरे, आशा दिघे, मिलिंद कानवडे, सीताराम राऊत, मीरा शेटे, मंगल पवार, अनिता हराळ, महेंद्र गोडगे, अनुराधा नागवडे, प्रताप शेळके,शांताबाई खैरे आदी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post