माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या इमारतीवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार ही इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहे. मोठी इमारत पाडल्यामुळे शहरातील अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.
मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी काहींनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे धाव घेतली आहे.
ही इमारत बांधल्यापासून तशीच मोकळ्या अवस्थेत उभी होती. ही इमारत अनधिकृत पणे उभारण्यात आली होती त्यामुळे इमारतीचा वाद न्यायालयात गेला होता.
जिल्हाधिकारी यांनी घेतलेली खमकी भूमिका नगरकरांचा चर्चेचा विषय ठरली आहे. या अगोदरही महापालिकेचा पदभार असतांना जिल्हाधिकारी यांनी अनेक पक्क्या बांधकामांवर हातोडा चालवला आहे.
महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने शनिवारी रात्री ही अनधिकृत इमारत पाडण्याचे नियोजन केले. विरोध होऊ नये म्हणून भल्या सकाळी सकाळीच इमारती वर हातोडा टाकला. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
Post a Comment