...अखेर त्या संस्था चालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -
भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्द्गुरू रोहिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांविरुद्ध भिंगारलकँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुभाष बन्सी साळवे (अध्यक्ष ), अनिता सुभाष साळवे (खजिनदार), अनिल तुळशीदास शिंदे (सचिव), मंगल अनिल शिंदे (उपाध्यक्ष), राजू बन्सी साळवे (सदस्य), संजय बन्सी साळवे (सदस्य), रेखा सुजय साळवे (सदस्य, रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार, नगर) यांचा समावेश आहे.
सद्गुरु प्रतिष्ठानच्या शिक्षण संस्था प्राध्यापकांकडून पैसे घेऊन नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. सर्व विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करावे, यासाठी शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment