उपोषण मागे घेण्यासाठी चक्क खंडणीची मागणी


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर – उपोषण मागे घेण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणेस वेठीस धरून तीन लाख रूपये खंडणीची मागणी केल्याची घटना सोमवारी (दि.16) सायंकाळी 6 वा. राहुरी कृषी विद्यापीठ येथे घडली.

अनिल शिवराम हापसे (रा. घोरपडवाडी, ता. राहुरी. याने धिरजकुमार मोहन गायकवाड (वय 39, रा. स्वामी समर्थ मंदिर, मुंजोबा नगर, ता. राहुरी, मुळ रा. नंदनवन कॉलनी, कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ, सावेडी) यांच्या विरूध्द मंगळवारी (दि.17) महावितरण कार्यालय राहुरी येथील प्रस्ताविक उपोषण मागे घेण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणेस वेठीस धरून मयुर अशोक जाधव यांच्याकडे तीन लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी धिरजकुमार गायकवाड यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 384 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून तपास पो.ना. खंडागळे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post