भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत मुक्त चिन्हांचाच वापर व्हावा


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- अहमदनगर कॅन्टोंन्मेंट बोर्डच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुक्त चिन्हाचाच वापर व्हावा, अशी मागणी कॅन्टोंन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष अॅड. आर. आर. पिल्ले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. कॅन्टोंन्मेंट बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडिअर विजयसिंग राणा व मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना भिंगार काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटले. यावेळी या विषयावर उभयंतांमध्ये चर्चा झाली. निवडणूक नियम व नागरिकांची मागणी याचा विचार करुन तसा प्रस्ताव निवडणुक आयोगाला पाठविला जाईल असे आश्‍वासन बिग्रेडिअर राणा व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

सन 2007 पूर्वी झालेल्या कॅन्टोंन्मेंट बोर्डच्या निवडणुकीत मुक्त चिन्हाचा वापर झाल्याने तत्कालीन निवडणुकीतील सर्व उमेदवार हे स्वतंत्र म्हणजे अपक्ष होते. त्यावेळी नियमानुसार निवडणूक चिन्ह कोणते यावर खुलासा केला नाही. पण 2007 पासूनच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर सुरु झाला. कॅन्टोंन्मेंट बोर्डच्या अवघ्या 7 जागेसाठीची ही निवडणुक राजकीय रस्सीखेच राजकारण घडत लढविण्याने नागरी सुविधा, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणारे स्वतंत्र-अपक्ष उमेदवार हे राजकारणाच्या भाऊगर्दीत मागे पडतात.

विकासाच्या प्रश्‍नांपेक्षा राजकारणावर निवडणुका होतील आणि भिंगार सारखे उपनगरातही राजकीय वैमनस्य निर्माण होवू शकते, असा मुद्दा शिष्टमंडळातील पक्ष प्रवक्ता रिजवान शेख यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुकी दरम्यान तणाव निर्माण होवू देऊ नये, यासाठी मुक्त चिन्हांचाच वापर व्हावा, असे यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील पिल्ले व सदस्यांनी स्पष्ट केले.

सन 2014 म्हणजे गतवेळी झालेल्या निवडणुकीपूर्वी मुक्त चिन्हावर निवडणुक घेणेबाबत कॅन्टोन्मेंटने वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती, असे ब्रिगेडिअर राणा व श्री.पवार यांच्या निर्देशनास शिष्टमंडळाने आणून दिले. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यक्षेत्रात 7 प्रभाग असून, निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी मुक्त चिन्हांची आवश्यकता आहे, असे प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर यांनी स्पष्ट केले.

पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी संजय झोडगे, कार्याध्यक्ष संजय खडके, सरचिटणीस निजाम पठाण, उपाध्यक्ष संतोष धीवर, महिलाध्यक्षा मार्गरेट जाधव, अॅड.साहेबराव चौधरी, सेवा दलाचे अध्यक्ष संतोष फुलारी मागास. विभागाचे नगर शहराध्यक्ष संतोष कांबळे, सदस्य सर्वश्री अनिल वराडे, संतोष कोलते, दिपक लोखंडे, लक्ष्मण साखरे, जालिंदर अळकुटे, विशाल विश्‍वकर्मा, श्रीमती मंदा होंडगे, सुनिल उल्हारे, तसेच कोषाध्यक्ष सुभाष त्रिमुखे, सचिव सोपान साळूंके आदि शिष्टमंडळात होते. निवडणुक प्रक्रिया नियमांनुसार पूर्ण करतांना नागरिकांच्या मतांचा आदर केला जाईल, तसा प्रस्ताव निवडणुक आयोगाला पाठविला जाईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post