अण्णांचा पुन्हा एल्गार! निर्भयाच्या आरोपींना फाशी होईपर्यंत आता मौन


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर: दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी होत आहे. या दोषींना जोपर्यंत फाशी देत नाहीत तोपर्यंत आपण मौन धारण करणार असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी अण्णा हजारे आपलं मौन सुरु करणार आहेत.

दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणातील चारही नराधमांना २०१३मध्ये फाशीची शिक्षा झाली होती मात्र, तरी सुद्धा या आरोपींना अद्याप फाशी झाली नाही. वास्तविक पाहता निर्भयाची आई अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे मात्र त्या आईची मागणी आणि त्या आईचे अश्रू सरकारला दिसत नाही सरकार आंधळं झालं आहे.

निर्भयाच्या दोषींना फाशी व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे. मात्र त्याच्या फाशीला विलंब होतं आहे. हे विलंब केवळ आणि केवळ केंद्र सरकारमुळे होतं असल्याची घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

सध्या देशातील प्रत्येक राज्यात महिलांवर युवतींवर आत्याचार होतं असल्याचे समोर येत आहे. दरम्यान अशा घटनांत न्याय मिळविण्यासाठी न्यायालयांत जितके न्यायाधीश पाहिजेत तितके न्यायाधीश देशात किंवा प्रत्येक राज्यात नाहीत त्यामुळे न्याय मिळायला उशीर होतं आहे असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post