संविधान बदलण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा : मल्लिकार्जुन खर्गे



माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडावा. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

आज नागपूर येथे यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीला विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, चेला वामशी चंद रेड्डी, बी. एम. संदीप, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बब्लू देशमुख, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर, माजी आ. वामनराव कासावार, विजय खडसे, किर्ती गांधी, प्रविण देशमुख, प्रकाश पाटील देवसरकर, बाळासाहेब मांगूळकर डॉ. मोहम्मद नदीम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, शाम उमाळकर, प्रकाश देवतळे, रामकिशन ओझा, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post