10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कराची शिफारस


माय अहमदनगर वेब टीम
नवीदिल्ली- पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर होणार्‍या अर्थसंकल्पात मध्यम उत्पन्न असणार्‍या नागरिकांसाठी गूड न्यूज आहे. कर संरचनेचा आढावा घेणार्‍या समितीकडून 10 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असणार्‍या करदात्यांसाठी सरसकट 10 टक्के आयकराची शिफारस करण्यात आली आहे. तर 10 ते 20 लाखांचे वार्षिक उत्पन्न असणार्‍या लोकांसाठी 20 टक्के कर असावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या अर्थसंकल्पामध्ये या शिफारसींचा विचार केला तर ही मध्यमवर्गीयांसाठी खूप दिलासादायक बातमी असेल. 20 लाख ते 2 कोटी दरम्यान वार्षिक उत्पन्न असणार्‍या करदात्यांसाठी 30 टक्के, वार्षिक उत्पन्न 2 कोटींहून अधिक असणार्‍या करदात्यांसाठी 35 टक्के कर असावा, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post