माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील हा चित्रपट मराठी डब करण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यातच आता हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार असून लवकरच त्याचा मराठी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटवर एक पोस्ट करत 'तान्हाजी' हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं. त्यासोबतच १० डिसेंबर २०१९ रोजी त्याचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
Post a Comment