रोहित शर्मा बनला सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर
माय अहमदनगर वेब टीम- वेस्टइंडिजने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताला 316 धावांचे आव्हान दिले आहे. कटक येथील बाराबती मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रोहित शर्माने 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. वेस्टइंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने 9 धावा करताच तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर बनला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याच्या नावावर हा विक्रम होता. जयसूर्याने 1997 मध्ये सलामीवीर म्हणून 2387 धावा केल्या होत्या.
होप एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणार दुसरा वेस्टइंडियन
शाई होप वेस्ट इंडिजकडून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने यावर्षी 1345 धावा केल्या आहेत. याबाबत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा पहिल्या स्थानावर आहे. लाराने 1993 मध्ये 1349 धावा केल्या होत्या. लाराचा विक्रम मोडण्यात होप 4 धावांनी हुकला. तर कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याबाबत डेसमंड हेंस तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 1985 मध्ये 1232 धावा केल्या होत्या.
Post a Comment