चांगल्या विचारांची युवाशक्ती हिच समाजाची मोठी ताकद : आ.संग्राम जगताप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : युवाशक्ती हि कुठल्याही समाजाची खरी ताकद असते. चांगल्या विचारांचे युवक एका ध्येयाने एकत्र आल्यास त्यांच्या हातून मोठे कार्य घडू शकते. नगरमधील जिनगर युवा मंच अशाच उद्देशाने समाजासाठी योगदान देत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजपयोगी उपक्रम राबवून या मंचने आदर्श निर्माण केला आहे. या मंचच्या वाटचालीत आवश्यक तिथे कायम सहकार्य करण्याची भूमिका राहील, अशी ग्वाही आ.संग्राम जगताप यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यशाबद्दल अहमदनगर जिनगर युवा मंचच्यावतीने मोचीगल्ली येथे आ.संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते. मंचच्या सदस्यांनी आ.संग्राम जगताप यांचा सत्कार करून त्यांच्या हातून नगर शहराचा सर्वांगीण विकास निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना आ.जगताप पुढे म्हणाले की, जिनगर युवा मंचमध्ये विविध क्षेत्रात कर्तृत्त्वाने पुढे आलेले युवक कार्यरत आहेत. मंचतर्फे वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येतात. यातून सर्वांना एकत्र आणण्याबरोबरच एक चांगला संदेश पोहचविण्याचे काम होते. नगर शहराच्या विकासातही युवकांच्या अशा संघटना महत्त्वपूर्ण योगदान देवू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिनगर युवा मंच वर्षभर विविध उपक्रम राबवून समाज संघटन, जागृती तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे काम करीत आहे. यात रक्तदान शिबिराचे आयोजन, रामदेवबाबा जन्मोत्सव, समाजाचे स्नेहमिलन, शैक्षणिक व्याख्यानांचे आयोजन, सामाजिक विषयांवर जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.ए.निखील गोयल यांनी केले.
Post a Comment