नगरला रविवारी दशवार्षिक राज्यस्तरीय बालभजन महोत्सव



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर:- बालगायक, वादकामध्ये अध्यात्मिक व धार्मिक संस्कार रूजावेत, संगीत साधने विषयीच्या त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने नगरच्या श्री.सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने येत्या रविवारी दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण कार्यालयात राज्यस्तरीय सत्यसाई बालभजन महोत्सव संपन्न होत असल्याची माहिती संयोजक अशोक कुरापाटी यांनी दिली. श्री. सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने संपन्न होत असलेल्या या महोत्सवाचे यंदाचे हे १० वे वर्ष आहे. या महोत्सवात राज्यभरातील सुमारे १५० बाल गायक/वादक सहभागी होत सादरीकरण करणार आहेत. सर्व बालक भगवान सत्यसाईबाबांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त ९४ भजने सादर करणार आहेत. या बालभजन मोहत्सावाचे उद्घाटन अल्पवयात संगीत साधनेत चमकदार कामगिरी बजावणारे दरदर्शन वाहिनीवरील कार्याक्रमात सुयश प्राप्त केलेले लातूरचे बालगायक अनाहत देशमुख व सायली टाक यांचे हस्ते होणार आहे.

सकाळी ९ ते १ या वेळात राज्यातून आलेले बालगायक/वादक आपली कला सादर करतील. दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात प्रमुख अतिथी बालगायकाचे नगरच्या रसिकांसाठी मैफल सादर होणार आहे. त्यांच्याच हस्ते सहभागी बालगायकांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व गौरविका देवून सन्मान करणेत येणार आहे. हा महोत्सव रसिकांसाठी खुला व विनामूल्य असून या संगीताच्या मनस्वी आनंदी सोहळयात सहभागी होवून उमलत्या पिढीकडून अध्यात्मिक भावभक्तीचा स्वरानंद मिळवावा असे आवाहन जिल्हा समिती प्रमुख नंदलाल भालेराव, बालविकास प्रमुख डॉ. राजलक्ष्मी दुधगी यांनी केले आहे

बालकलाकारांचा अल्प परिचय.


१. अनाहत शशिकांत देशमुख, इ. ९ वी - आई-वडीलांकडून सशक्त सांगीतिक वारसा लाभलेला अनाहत
लहानपणापासूनच माफलामध्ये दमदार व परिणामकारक गायन करून रसिकांना मंत्रमग्ध करत आहे. स्वर तालाची समज उपजतच आहच। पण त्याही पलीकडे श्रुती व लयकारीचीही उत्तम जाण वाखाणण्याजोगी आहे. गायनाचे दमदार, परिपक्व व परिपूर्ण प्रदर्शन, आवाजात कमालीची सुरेलता व तानेची स्वच्छ फिरक ही त्याच्या गायनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. अनाहतची आई डॉ. वृषाली व वडील प्रा. शशिकांत यांच्याकडून शास्त्रीय गायनाची तालीम तो घेत आहे. अखिल भारतीय गंधर्व मंडळ मुंबई येथील मध्यमा प्रथम परीक्षेत तो विशेष प्रावीण्यसह उत्तीर्ण झाला आहे. स्पर्धात्मक यश पढील प्रमाणे-रसिक मंडळ माजलगाव आयोजित राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेमध्ये बाल गटामध्ये २०१५ साली प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे व २०१९ साली अहमदनगर येथे संपन्न झालेल्या भक्ती सुमन या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच त्याला पाश्चात्य संगीताचीही आवड आहे. सिंथेसायझर तसेच ड्रम सेट ही वाद्य ही तो सफाईदारपणे वाजवतो. तसेच संगीत
कार्यक्रमात संयोजक म्हणूनही काही हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, अरेबिक अशी विविध भाषेतील गाणी अनाहत ने गायली आहेत. अनाहत देशमुख ऑफि सिएल या यू ट्युब चैनेल्सवर त्याच्या सर्व कव्हर गीतेज् चा आस्वाद घेता येईल. विविध भाषेतील अस्खलित उच्चार व सांगीतिक वैशिष्ट्यांचे सादरीकरण तो सहज करतो हा देखील त्याचा एक विशेष उपजत गुण म्हणावा लागेल. अनेक थोरा मोठ्यांचे आर्शिवाद त्याला मिळाले आहेत. यामध्ये गुरूवर्य पं. शिवदासजी देगलूरकर, पं. संजीव अभ्यंकर, गुरूवर्य प्राणेश पोरे, डॉ. करूणा देशपांडे, पं. जयतीर्थी मेधुंडी, पं. रघुनंदन पणशीकर इ. भावगीत, भक्तिगीत, नाटयगीत तसेच चित्रपट गीत या विविध प्रकाराला साजेसा आवाज असणारा नक्कीच भविष्यात या क्षेत्रात उज्वल यश संपादन करेल व स्वतःची एक वेगळी ओळख संगीत जगतात निर्माण
करेल अशी खात्री आहे. आवाजातील विविधता, लयकारी, आलापीची मांडणी, ताणाचे गमक, गीत तालीची समज, गीताचा भाव व मांडणी यावर मेहनत घेवून लहान वयातच संगीत क्षेत्रात उतुंग झेप घेत आहे. ..



दुसरी बाल कलाकार . कु. सायली सुनील टाक इ. ६ वी - सायली वयाच्या दुसऱ्या वर्षापासून टेलिव्हीजनवर गाणे ऐकून गात होती. त्यातच तिचे वडील श्री. सुनिल टाक व आई सौ. सुषमा टाक यांना गायनाची आवड होती. हेच गायनाचे गुण हेरून त्यांनी सायलीला संगीत क्षेत्रातमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रकारचा सांगीतिक वारसा नसतांना स्वर, ताल व लयीची उपजत समज आहे. तिच्या गाण्याची वैशिष्ट्ये म्हणजे सुरेल आवाज व गाण्याची फिरक, आता सायली गुरूवर्य प्रा. शशिकांत देशमुख व गुरुवर्य डॉ. वृषाली देशमुख यांच्याकडे गायनाचे शास्त्रोक्त धडे गिरवत आहे. अखिल भारतीय गांधर्व मंडळ येथील प्रारंभिक परिक्षेत ती विशेष प्रवीण्यासह उत्तीर्ण झाली आहे. तिचे स्पर्धात्मक यश पुढीलप्रमाणे - राज्यस्तरीय वैयक्तिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत बाल गटात
उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून पहिल्यांदा मंचावर गायली. रसिक मंडळ माजलगांव राज्यस्तरीय सुगम नाट्य गीत गायन स्पर्धेमध्ये तिने बाल गटामध्ये २०१८ साली प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच स्व. पं. शकुंतलादेवी चिगरी प्रतिष्ठानद्वारा आयोजित राज्यस्तरीय सुगम स्पर्धेत २०१९ चे द्वितीय पारितोषिक पटकावले. तसेच अहमदनगर येथे संपन्न झालेल्या भक्ती सुमन या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. शास्त्रीय संगीताबरोबर सायलीला सुगम व भक्ती संगीताची आवड आहे. आतापर्यन्त सायलीला बऱ्याच दिग्गजांचे मार्गदर्शन व आर्शीवाद मिळाले आहेत त्यात डॉ. अश्विनीताई भिडे, श्री. महेशजी काळे, श्री. अवधूतजी गुप्ते, श्री. अंगद गायकवाड सर यांचा समावेश आहे. आपल्या महनतीच्या व जिद्दीच्या बळावर भविष्यामध्ये संगीत जगतात आपला एक वेगळा ठसा नक्कीच सायली उमटवल ही अपेक्षा अल्प वयात अशी चमकदार कामगिरी करणारे बालकलावंत यंदाच्या श्री सत्यसाई बालभजन महोत्सवाची शान आहे. अल्प वयात प्रतिभावंत बालगायिकांचा गाता गाळा घराघरात दाद मिळवित आहे. आवाजातील विविधता, लयकारी आलापीची मांडणी, तानाचे गमक
गीत, तालाची समज, गीताचा भाव व मांडणी यावर मेहनत घेवन लहान वयातच या दोन्ही बालगायक संगीत क्षेत्रात उतुंग झेप घेत आहे..

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post