महापालिकांमधील बहुसदस्यी प्रभाग पध्दत रद्द


माय अहमदनगर वेब टीम

नागपूर – सध्याची बहुसदस्यी प्रभाग पध्दत रद् करून एक वार्ड, एक नगरसेवक ही नवी पध्दती आता राज्यातील महापालिकांमध्ये अंमलात येणार आहे. महापालिका सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले आहे.

सुरूवातीच्या काळात तीन, नंतर दोन आणि एक अन् पुन्हा दोन अशा पध्दतीने महापालिका क्षेत्रात वार्डातून नगरसेवक निवडून देण्याची पध्दत होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्वीची पध्दत रद्द करत एका वार्डात 4 सदस्य निवडीचे धोरण अवंलबित तसा कायदा केला. नगरसह राज्यातील अनेक महापालिकेची निवडणूक पहिल्यादांच या धर्तीवर झाली. फडणवीस सरकारचा हा कायदाच मुख्यमंत्री ठाकरे सरकारने आता रद्द केला आहे. नव्या कायद्यानुसार आता एका वार्डातून एकच नगरसेवक निवडून दिला जाणार आहे. ठाकरे सरकारने मांडलेले तसे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला विरोध दर्शविला. महापौर यांची बैठक घ्या त्यात त्यांची मते घ्या. मग निर्णय घ्या असे सांगत त्यांनी संयुक्त चिकीत्सा समितीला 6 महिन्यांची मुदत देऊन त्यांच्याकडे हे बिल देण्याची मागणी केली. मात्र ठाकरे सरकारने हे नवे विधेयक मंजूर केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post