शिवसेनेत फाटाफूट ; राठोड यांना धक्का देत 'बाप्पा' विजयी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 'बाप्पा' (नगरसेवक अनिल शिंदे) व राष्ट्रवादी चे नगरसेवक विनीत पाउलबुद्धे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालावरून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे पहावयास मिळाले आहे. बाप्पा विजयी झाल्याने उपनेते राठोड यांनी धक्का दिल्याचे बोलले जात आहे. शिंदे, पाउलबुद्धे विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान माजी नगरसेवक यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.


तीन जागांसाठीच्या या निवडणुकीतील एक जागा बिनविरोध झाली. भाजपच्या आशा कराळे यांना संधी मिळाली. उर्वरीत दोन्ही जागाही बिनविरोध होतील असे प्रयत्न सुरु होते. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य समितीवर पाठवावा, असा मतप्रवाह नगरसेवकांमधून पुढे आला होता. त्यात भाजपकडून कराळे व राष्ट्रवादीकडून पाउलबुधे यांची नावे निश्चित झाली. मात्र, शिवसेनेत उमेदवारीवरुनच संघर्ष उफाळून आला. अनिल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्याच अमोल येवले यांनी उमेदवारी केली. तसेच सुवर्णा जाधव यांनाही पाउलबुधे यांच्या विरोधात उतरविण्यात आले. सेनेचे दोन उमेदवार समोरासमोर आल्याने शिवसेनेत फूट पडणार असल्याचे चित्र होते. निवडणूक निकालात अमोल येवले व सुवर्णा जाधव यांना केवळ १०-१५ मते मिळाल्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपनेही अनिल शिंदे यांना साथ देत शिवसेनेच्या राठोड गटाला धक्का दिला आहे.


जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचा निकाल

सर्वसाधारण प्रवर्ग

अनिल शिंदे : ५२ मते (शिवसेना)
अमोल येवले : १० मते (शिवसेना)
बाद मतदान : ५

नागरीकांचा मागास (OBC) प्रवर्ग

विनित पाऊलबुधे : ४८ मते (राष्ट्रवादी)
सुवर्णा जाधव : १५ मते (शिवसेना)
बाद मतदान : ४

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post