14 लाखांच्या देशी-विदेशी, हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नाताळ व नवीन वर्षाच्या पार्श्‍वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क पथकाने गव्हाणेवाडी, दाणेवाडी येथील हातभट्टी निर्मिती केंद्रावर तसेच वाळवणे, टाकळी ढोकेश्‍वर येथील अवैध दारु धंद्यावर छापे टाकून 14 लाख 13 हजार 750 रुपायाचा माल जप्त करुन 5 हजार 700 लिटर रसायन नष्ट केले. ही कारवाई बुधवारी (दि. 25) पहाटेच्या सुमारास केली.


या कारवाईत संजय मारुती कार्ले, आप्पासाहेब मारुतराव काळे, सुनिल हनुमंत दाते यांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारु, हातभट्टी गावठी दारु, महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ, हुद्याई वेरना कार, एक दुचाकी असा सुमारे 14 लाख 13 हजार 750 रुपायाचा माल जप्त केला.

ही कारवाई विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग प्रसाद सुर्वे, उपायुक्त पराग नवलकर, अधीक्षक सी. पी. निकम यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक संजय एम. सराफ, निरीक्षक बी. बनकर, दुय्यम निरीक्षक जी. आर. चांदेकर, एस. एस. भोसले, महिपाल धोका, वाहनचालक पांडुरंग गदादे, महिला पोलिस स्विटी राठोड, निलेश शिंदे, अरुण जाधव, योगश मडकर, वसंत पालवे, सचिन वामने, अविनाश कांबळे, भरत तांबट, नंदुकुमार ठोकळ यांनी केली आहे.
पुढील तपास निरीक्षक संजय सराफ, आण्णासाहेब बनकर हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post