भिंगारमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भिंगारमध्ये हिंदू राष्ट्र सेना, भाजपा, शिव प्रतिष्ठान, शिवसेना या सह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता.
वडारवाडी येथील हनुमान मंदिरा पासून सुरू झालेल्या या मोर्चात सतिश मोरे, वसंत राठोड, विजय नामदे, शिवाजी दहिहंडे, विनोद काशिद, महेश नामदे, निलेश साठे, किशोर कटोरे, प्रतिक लालबोंद्रे, प्रणित सोनवणे, यश रवे, अंकुश तरवडे, सचिन पेंडुरकर, अमित काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यावर आल्यानंतर पोलीस प्रशासनाला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. आमचा या कायद्याला पाठींबा असून जे या कायद्याला विरोध करतात त्यांना हा कायदा नेमका काय आहे? व त्याचे परिणाम काय होणार आहेत? याची माहिती देण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Post a Comment