Change Cookies Setting
चंदिगड : गेल्या काही दिवसांपासून वायव्य भागात तीव्र थंडी व धुक्यामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजून काही दिवस तरी थंडी व दाट धुक्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील दोन दिवस अनेक ठिकाणांवर दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पंजाब आणि हरियाणातील पोलिसांना तसेच संबंधित विभागांना चालकांना याबाबत सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यानंतरही रस्ते अपघातांत वाढ होत आहे.
रविवारी लुधियानाजवळ अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दशकांनंतर पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा गरीब आणि खालच्या भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर अधिक परिणाम झाला आहे. परंतु तीव्र थंडीच्या काळात पडणाऱ्या धुक्यामुळे गव्हाच्या पिकाला फायदा होणार आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. बाजारपेठांमध्ये, मंडी, गल्ली-मोहल्ल्यांमध्ये शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण करण्यात येत आहे. वाढणाऱ्या थंडी गव्हाच्या पिकाला फायदेशीर ठरणार आहे. जेवढी थंडी वाढेल, तेवढे जास्त गव्हाचे उत्पादन होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र डॉक्टरांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. रामसरूप, बलबीर, दलजित या शेतकऱ्यांनी सांगितले, दाट धुके गव्हाच्या पिकासाठी फायदेशीर आहे. जेवढी जास्त थंडी असेल, तेवढा गव्हाच्या पिकाला फायदा होईल. हरियाणातील नारनोलमध्ये पारा एक अंशावर आला.
Post a Comment