'या' गावात होतो 'एक लग्न, एक वृक्ष उपक्रम'


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत ‘एक लग्न एक वृक्ष’ असा उपक्रम पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे सुरू करण्यात आला आहे. युवक मित्र हभप बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेतून सतीश-अर्चना जगताप परिवार, सुधीर-श्वेता गायकवाड परिवार, अजित-निकिता म्हस्के परिवार या नववधू जोडप्यांनी एक एक वृक्ष लावले. या नववधूचे लग्न 29 रोजी कासार पिंपळगाव येथे संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी मंदिर परिसरात संरक्षित जाळ्यासहीत प्रत्येकी एक वृक्ष लावला. तीन वधू-वर दाम्पत्यांंनी अनावश्यक खर्च टाळून गावातील मंदिर परिसरात वृक्षारोपण केले.

या कार्यक्रमास उपपोलीस निरीक्षक वसंत उत्तम पवार, निवृत्त पोलीस निरीक्षक मुक्ताजी भगत, सामाजिक कार्यकर्ते संदीप राजळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत, हभप दत्तात्रेय राजळे, भा. पा. राजळे, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, विक्रम सर राजळे आदी उपस्थित होते. एक लग्न, एक वृक्ष या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी ओढ गावाकडची प्रतिष्ठान, कासार पिंपळगाव यांचे सहकार्य लाभले. वृक्षमित्र सुखदेव म्हस्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post