हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खाव्यात या पाच पालेभाज्या



माय नगर वेब टीम
हेल्थ डेस्क - हिवाळ्यात थंडी, ताप, हातपाय दुखणे यासारख्या सामान्य आजारापासून बचाव करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे फार महत्त्वाचे आहे. या पालेभाज्या आपल्याला निरोगी ठेवतात.

पालक : लोह, मॅग्नेशियम, विटॉमिन अ आणि के असलेले पालक रक्त सर्कुलेशन बरोबरच ठेवते. शिवाय रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, या दिवसात आपल्याला अनेक रोगांपासून वाचवते. याव्यतिरिक्त ते चयापचय वाढवून वजन नियंत्रित करण्यासदेखील मदत करते. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा पालक खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
विशेष काय : पालक खाल्ल्याने महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका ४० टक्के कमी होतो

चवळी : यात अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराचे सांधे मजबूत होतात. आठवड्यातून एकदा या भाजीचे सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहता. पांढर्‍या केसांची काळजी असेल तर चवळीची भाजी खायला हवी त्यातील खनिजे आणि जीवनसत्त्वे केसांना पांढरे होण्यापासून वाचवते.
विशेष काय : २ चम्मच चवळीचा रस पिल्याने अॅसिडीटीचा त्रास दूर होतो.


मेथी : यात कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. हे शरीरास जिवाणू आणि बुरशीजन्य संक्रमणाशी लढण्यासाठी सामर्थ्य देते. यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत ज्यामुळे सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून बचाव होतो. मेथी खाल्ल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मेथीत पॉलीफेनोलिक फ्लॅव्होनॉइड्समध्ये आढळते जे मूत्रपिंडांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
विशेष : १०० ग्राम मेथीत १५ ग्राम डायटरी फाइबर असते. यामुळे डायजेशन चांगले राहते.

मुळ्याची पाने : बहुतेक लोक मुळा खातात, परंतु त्याचे पाने फेकून देतात. तथापि, मुळापेक्षा त्याची पाने जास्त फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेले पोषकतत्व शरीर उबदार ठेवते शिवाय सर्दी, कफ, खोकला या समस्यांपासून संरक्षण करते. त्यात व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते, जे डोळे आणि हाडांसाठी प्रभावी असते.
विशेष काय : १००ग्रॅम मूळच्या पत्त्यात १६ टक्क्े विटामिन सी असते. यामुळे स्कर्वी सारखी समस्ये पासून दूर रहता येते.

माेहरीची भाजी : यात प्रथिने, फायबर तसेच कार्बोहायड्रेट्स, साखर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमधील अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फरमुळे पोट साफ राहते. यात अँटी-बॅक्टेरिया आणि अँटीफंगल गुणधर्म असतात त्यामुळे योनिमार्गाच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदतगार ठरते.
विशेष काय : १०० ग्राम सरसोमध्ये ६० टक्के ए विटामिन असते. ते डोळ्यासाठी चांगले असते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post