सितसिपास पदार्पणात ठरला एटीपी फायनल्सचा चॅम्पियन





माय नगर वेब टीम
लंडन -स्टिफानाेस सितसिपास हा साेमवारी एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने या स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने याच्या फायनलमध्ये डाेमिनिक थिएमचा पराभव केला. त्याने ६-७, ६-२, ७-६ ने सामना जिंकला. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला.

सितसिपानने २०१६ मध्ये लंडनच्या याच आे-२ एरिनाच्या काेर्टवर थिएमला सराव करण्यासाठी मदत केली. मात्र, आता तीन वर्षांनंतर याच काेर्टवर थिएमवर विजय संपादन करू शकू, असा विचारही त्याने कधी केला नसेल. मात्र, आता प्रत्यक्षात त्याने या पराक्रम गाजवला आहे. आता थिएम हा चॅम्पियन झाला नाही. आता सितसिपासची फायनलमधील कामगिरी सर्वात सरस ठरली. पहिल्या सेटमधील अपयशातून सावरत त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारून सामना आपल्या नावे केला.

आॅस्ट्रियाच्या थिएमने या स्पर्धेत चाैथ्यांदा खेळताना प्रथमच फायनल गाठली हाेती. दुसरीकडे सितसिपास हा पहिल्यांदाच सहभागी झाला आणि चॅम्पियन झाला आहे. सहाव्या मानांकित सितसिपास आणि पाचव्या मानांकित थिएम यांच्यातील हा सातवा सामना हाेता. यात सितसिपास तीन वेळा विजयी झाला. आता त्याने दाेन तास ३५ मिनिटांत थिएमला पराभूत केले. सितसिपासने गत वर्षी २१ वर्षांखालील नेक्स्ट जेन टेनिस स्पर्धा जिंकली हाेती. युवा गुणवंत युवा खेळाडूंची स्पर्धा असते. एक वर्षाच्या आत त्याने सत्रातील ही स्पर्धा जिंकली.
घरच्या मैदानावर खेळत असल्याचा अनुभव :
‘येथील काेर्टवर मला स्थानिक चाहत्यांचा माेठे पाठबळ लाभले. मी त्या सर्वच चाहत्यांचा फार आभारी आहे. त्यांनी माझ्या देशाचा ध्वज उंचावून माेठा पाठिंबा दिला. या साऱ्यातून माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. थिएमची सर्व्हिस दाेन वेळा ब्रेक करेल, असे मी स्वप्नातही पाहिले नव्हते, असे सितसिपास म्हणाला.

२०१७ मध्ये टाॅप-१०० मध्ये, आता दाेन वर्षांत टाॅप-५ मध्ये

सितसिपासने २०१३ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षीय आयटीएफमधून टेनिस स्पर्धेतील सामने खेळण्यास सुरुवात केली. ताे २०१७ मध्ये पहिल्यांदा एटीपी स्पर्धा खेळला. त्याने याच वर्षी करिअरमधील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळली. ताे फ्रेंच आेपनमध्ये सहभागी झाला हाेता. त्यानंतर ताे विम्बल्डन, शांघाय मास्टर्स, नेक्स्ट जेन एटीपीमध्ये सहभागी झाला हाेता. त्याने प्रथमच टाॅप-१०० मध्ये स्थान मिळवले हाेते. २०१८ मध्ये त्याने नेक्स्ट जेन एटीपी किताब जिंकला हाेता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post